पर्यावरण संरक्षण समितीच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र आलो
आहोत. १५ ऑगस्ट २०१६ च्या प्रथम सभेपासुन वसईच्या पर्यावरण संरक्षण आणि
संवर्धन जनजागृतीच्या कार्यास आपण सुरुवात केली आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या येउ घातलेल्या २०२१-२०४१ च्या विकास (?) आराखाड्याचा अभ्यास करण्यासाठी आणि स्थानिकांवर होऊ घातलेल्या अन्यायाविरुद्ध योग्य मार्गाने विरोध करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीने सुरुवात केली आहे. त्यासाठी पर्यावरण तज्ञ असलेले फादर दिब्रिटो, चंद्रशेखर प्रभूआणि अनेक ज्येष्ठ अनुभवी कार्यकर्ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या येउ घातलेल्या २०२१-२०४१ च्या विकास (?) आराखाड्याचा अभ्यास करण्यासाठी आणि स्थानिकांवर होऊ घातलेल्या अन्यायाविरुद्ध योग्य मार्गाने विरोध करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीने सुरुवात केली आहे. त्यासाठी पर्यावरण तज्ञ असलेले फादर दिब्रिटो, चंद्रशेखर प्रभूआणि अनेक ज्येष्ठ अनुभवी कार्यकर्ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.
गेले अनेक महिने सुरु असलेल्या आपल्या लढ्यातुन अनेक मुद्दे
समोर आले आहेत. पर्यावरण संरक्षण समितीच्या सभेत चंद्रशेखर प्रभुनी
सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त वसई विरार शहर महानगरपालिकेच्या
आराखड्यावर लक्ष केंद्रित करायचे नसुन , मुंबई प्रदेश विकास नियमावली आणि
प्रारुप आराखडा (२०१६-२०३६) ह्यांचा अभ्यास करुन हरकती नोंदवायच्या आहेत.
२७ नोव्हेंबर २०१६ च्या सभेत वसईच्या पर्यावरणास घातक असलेले
अनेक मुद्दे तीव्रतेने समोर आले आहेत. जसे वसईत कोस्टल रोड, मल्टीकॉरीडॉर
रोड, मेट्रो, इंडस्ट्रियल झोन मंजुर झाले आहेत. हे विकासासाठी दाखवण्यात
आलेले आमीष आहे. प्रत्यक्ष विकासयोजना (मेट्रो, रस्ते, उद्योगकेंद्र) सुरु
होण्याआधी इमारती आणि कारखाने बांधण्याची तजवीज आहे.
*हरीतपट्टा* नाव देउन प्रत्यक्षात वसईत शिल्लक असलेल्या
हिरव्या पट्ट्याचे शहरीकरण करण्याचे कारस्थान आहे. जिथे शेतीवाडी आहे तिथे
७-८ मजली उंच इमारती आणि विषारी रसायनांचे कारखाने उभारायची मोकळीक मिळणार
आहे. त्यासाठी विशेष विकास क्षेत्र असे विशेषण देण्यात आले आहे. वसई
तालुक्यातील कुठल्याही गावात कोणत्याही प्रकारची निसर्गहानी करण्याचा
परवाना ह्या आराखड्यातुन मिळणार आहे. ज्यांच्या अनेक पिढ्या ह्या मातीत
वाढल्या आणि मच्छीमारी, शेतीवाडी करत आहेत त्यांना बेरोजगार आणि बेघर
करण्यात येईल हे सदर आराखड्यात दिसत आहे.
ह्या सर्व धोक्यांवर हरकती घेण्यासाठी अतिशय थोडा कालावधी
उपलब्ध आहे. समितीचे कार्यकर्ते सातत्याने ह्या आराखाड्याचा अभ्यास करत
आहेत , तांत्रिक आणि नकाशे मुद्दे सहज सोप्या भाषेत गावकऱ्यांना समजावुन
देण्यासाठी प्रत्येक गावात सभा घेत आहेत. आता वसईविरारच्या गावांच्या
भविष्यासाठी आपल्याला एकत्र येउन काम करण्याशिवाय पर्याय नाही. सर्वांच्या
सहकार्यानेच हा लढा उभा रहाणार आहे.
समीर सुभाष वर्तक,
9326471352
निमंत्रक , पर्यावरण संवर्धन समिती,
website : www.pssv.org
email info@pssv.org support@pssv.org
9326471352
निमंत्रक , पर्यावरण संवर्धन समिती,
website : www.pssv.org
email info@pssv.org support@pssv.org
No comments:
Post a Comment