भगवान मंडलिक, कल्याण |
December 9, 2016 1:45 AM
२० वर्षांच्या नियोजनाचे प्राधिकरणाचे प्रयत्न
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ क्षेत्रातील शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत असताना तेथील वाहनांचा भार उपलब्ध रस्ते, व्यवस्थेवर पडत आहे. त्यामुळे प्राधिकरण क्षेत्रात मोठय़ा वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. हा विचार करून प्राधिकरणाने एकत्रित वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून महानगर प्रदेशात स्वतंत्र ‘ट्रान्सपोर्ट कॉरीडॉर’ (विशेष वाहतूक मार्ग) उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती प्राधिकरणातील एका उच्चपदस्थ सूत्राने दिली. प्राधिकरणाच्या आगामी वीस वर्षांच्या भविष्यवेध प्रकल्पात या विशेष वाहतूक मार्गाचा उल्लेख आहे.
मुंबईसह प्राधिकरण क्षेत्रात विविध आस्थापनांमध्ये सुमारे चाळीस लाख नोकरीच्या संधी आहेत. या चाळीस लाखांपैकी जवळपास ६८ टक्के नोक ऱ्या मुंबई क्षेत्रात आहेत. त्यामुळे रायगड, ठाणे, पालघर परिसरातील नोकरदार रेल्वे, बस, खासगी वाहनांच्या माध्यमांतून आपल्या नोकरीच्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘एमएमआरडी’च्या अहवालानुसार सरकारी, खासगी आस्थापनाव्यतिरिक्त अनेक लहान, मोठय़ा उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या २००१ मध्ये ७२ लाख होती. ही संख्या २०११ मध्ये ९१ लाख झाली आहे. ज्या प्रमाणात नागरीकरण होत आहे लोकसंख्या वाढत आहे. त्या प्रमाणात सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने, सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण दहा टक्क्यांनी घटल्याचे प्राधिकरणाच्या सव्र्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
https://mmrda.maharashtra.gov.in/multimodal-corridor-from-virar-to-alibaug
No comments:
Post a Comment