मार्गदर्शन सभा, १८ सप्टेंबर २०१६

निर्मळ येथे १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ऐतिहासिक सर्वसमावेशक सभेपासुन एक ध्येय घेऊन आपण सुरुवात केली आहे.
सुपीक जमीन, शुद्ध हवा आणि ताजे पाणी हा स्थानिकांचा हक्क आहे. निसर्गसौंदर्याने नटलेली *हिरवी वसई हि हिरवीच राहिली पाहिजे.* ख्रिश्चन, आगरी, पानमाळी, भंडारी,  ब्राम्हण, कोळी, मांगेला, आदिवासी, मुसलमान असे सर्व समाज आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्र येऊन लढा देत आहेत.
निर्मळ येथे झालेल्या सर्वप्रथम सभेत २०० पेक्षा अधिक संख्येने पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. सभेत ज्या सदस्यांनी नाव व मोबाईल नंबर नोंदणी केली ते व्हाट्सप ग्रूपवर समाविष्ट आहेत. आणि इतर सदस्यांचा समावेश करण्याचे सुरु आहे.
*प्रत्येक गावात स्थानिक सदस्यांच्या पुढाकाराने सभा आयोजित करण्यात येत आहेत.* ह्या सभेत समितीचे ध्येयधोरण, स्थानिक समस्या ह्यावर चर्चा होईल. त्याप्रमाणे प्रत्येक विभागात व्हाट्सप ग्रूप तयार करण्यात येतील.
काही कारणांमुळे अनेक गावकरी सभेस उपस्थित राहु शकले नाही. अनेक गावकऱ्यांनी सभेचे वृत्त कळल्यानंतर समितीत सामील होण्यासाठी संपर्क केला आहे. आपण सुरु केलेल्या सह्यांच्या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा लाभला आहे.

No comments:

Post a Comment