मुंबई महानगर प्राधिकरणाच्या प्रस्तावित विकास आराखडा २०१६-३६ – हरकतीचे ठळक मुद्दे


मुंबई महानगर प्राधिकरणाच्या प्रस्तावित विकास आराखडा २०१६-३६ –  हरकतीचे ठळक मुद्दे
१) कोणत्याही विभागाचा विकास आराखडा तयार करताना त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकास विश्वासात घ्यायचे असते मात्र सदर मुंबई महानगर प्राधिकरणाचा प्रस्तावित विकास आराखडा २०१६-३६ तयार करताना मला व या विभागातील जनतेला विश्वासात घेतले गेले नाही. म्हणून माझा या आराखड्याला विरोध आहे.
२) दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे; पर्यावरणाचा समतोलपणा ढासळत आहे. म्हणूनच हिरव्या व बागायती पट्ट्याला पूर्णपणे संरक्षण असावे व तिथे व्यापारी बांधकामे होऊ नयेत. स्थानिकांना त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीत घरे बांधण्यासाठी ०.३३ FSI आहे त्यात बदल करू नये. तशी हमी आपल्या आराखड्यात नसल्यामुळे माझा या आराखड्याला विरोध आहे.
३)  माझ्या विभागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही आणि पुढे मिळण्याचीही शक्यता नाही. (वसई-विरार उपप्रदेशाची विकास योजना - २००१-२१ पृ. ४२-४३ )  म्हणून माझा या आराखड्याला या माझा विरोध आहे.
४) आपल्या आराखडयात पृष्ठ क्र. ८ वर २.२.४.२.(६) नमूद केले आहे की हरित पट्ट्यात अतिप्रदूषणकारी आणि घातक उद्योगाला परवानगी दिली जाते.  ही अतिशय गंभीर व मानवी हक्काचे उल्लंघन करणारी बाब आहे. म्हणून माझा या आराखड्याला विरोध आहे.
५) हरित विभाग २ मध्ये खाणकामासाठी मुक्त परवाना दिलेला आहे. त्यामुळे पूर्वेकडचे डोंगर नष्ट होणार आहेत व पर्यावरणाची हानी होणार आहे. म्हणून माझा या आराखड्याला विरोध आहे.
६) हरित पट्टा १ मध्ये (पश्चिम वसई) घन कचरा प्रक्रिया प्रोजेक्ट दाखविलेले आहेत. क्र. २.२.४.२.(६) त्यामुळे येथील प्रदूषणामध्ये वाढ होणार आहे. म्हणून या आराखड्याला माझा विरोध आहे.
७) गावठाणाच्या परिसरात १ FSI दिल्यामुळे तिथे २४ मीटरच्या इमारती येऊ शकतात. (नियमावली २.४.१.८). त्यामुळे लोकसंख्येत प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला माझा ठाम विरोध आहे.
८) वसई मध्ये स्थानिक लोकांची वस्ती शेकडो वर्षांपासून आहे. त्यांनी स्वकष्टाने राहण्यासाठी घरे बांधली आहेत. नकाशात दाखविल्याप्रमाणे प्रस्तावित सागरी रस्ता व मेट्रो ह्यामुळे स्थानिक लोकांचे विस्थापन होणार आहे. म्हणून माझा या आराखड्याला विरोध आहे.
९) वसई तालुक्यातील भूगोल, संस्कृती, पर्यावरण व स्थानिक समाज उध्वस्त करणाऱ्या या एमएमआरडीए च्या आराखड्याला माझा ठाम विरोध आहे.

हरकती नोंदवताना लक्षात ठेवायचे मुद्दे
१) रकाना क्रमांक २ मध्ये स्वतःचे पूर्ण नाव लिहावे
२) रकाना क्रमांक ३ मध्ये संपूर्ण पत्ता, दूरध्वनी, ई-मेल वगैरे सर्व तपशील लिहावा.
३) रकाना क्रमांक ४ मध्ये आपणास लागू असणारे मुद्दे स्वतःच्या भाषेत, शब्दात (शक्यतो स्वतःच्या अक्षरात) लिहावे. नमुना पत्रिकेतून कॉपी करून तसेच्या तसे लिहू नये.
४) कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र अर्ज भरावा.
५) रकाना क्रमांक ५ मध्ये जोडत असलेल्या कागदपत्रांचा उल्लेख करावा. उदा. ७/१२ उतारे, घरपट्टीची पावती, धाऱ्याची पावती, रेशनकार्ड, आधारकार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल वगैरे.
६) रकाना क्रमांक ६ मध्ये O Yes/ होय या ठिकाणी O  अशी खूण करावी.
७) शेवटी सही करावी व नाव लिहावे.

पर्यावरण संवर्धन समिती, वसई-विरार Mob: 9326471352
 
http://www.pssv.org

No comments:

Post a Comment