हरकती साठी काही मुद्दे

वसई विरारसाठीचा विनाशकारी MMRDA विकास आराखडा २०१६-२०३६ प्रसिद्ध झाला आहे , आणि त्याविरुद्ध हरकत घेण्यासाठी १५ जानेवारी २०१७ पर्यंत मुदत उपलब्ध आहे.


आमच्या शेतीवाडी मच्छीमारी आणि इतर परंपरागत व्यवसाय आणि आमच्या पुर्वज-वाडवडिलांनी बांधलेल्या घरातुन-गावातुन मेट्रो आणि रस्ते न बांधता आमचा आणि आमच्या गावांचा विकास शक्य आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत. अशी भूमिका पर्यावरण संवर्धन समितीने घेतली आहे.

पर्यावरण संवर्धन समितीने सदर विकास आराखड्यास हरकती घेउन व पर्यायी विकास योजनांच्या मागण्यांसाठी  गावागावांत जनजागृती सुरु केली आहे. प्रत्येक गावातील कार्यकर्ते सभा घेऊन गावकऱ्यांना ह्या आराखाड्यातील धोके दाखवुन देत आहेत.


हरकती साठी काही मुद्दे

मी *संपूर्ण नाव* *पत्ता : घर क्रमांक, गाव, रस्ता ,  पालघर, पिनकोड* इथे रहातो/रहाते. माझे कुटुंब गेली अनेक पिढ्यांपासून इथे रहात आहे.

माझा शेती/मच्छीमारी/इतर व्यवसाय आहे.

मी *पत्ता* इथुन कामासाठी प्रवास करतो/करते.

मी *शाळा कॉलेज ऑफिस* इथे जातो/जाते/येतो/येते.

मी शुद्ध हवेसाठी *इथे* फिरतो/फिरते. *इथे* शुद्ध हवा आणि मोकळी जमीन आहे. हे माझ्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.

माझ्या शिक्षण/व्यवसाय/कामावर माझे जीवन अवलंबून आहे.

माझ्या उत्पन्नावर माझे कुटुंब अवलंबून आहे.

माझ्या व्यवसायावर अनेक लोकांचे उत्पन्न आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान अवलंबून आहे.

मी व्यवसाय/घर/शेती/जमीन/इतर कामासाठी कर्ज घेतले आहे.

मी जिथे व्यवसाय/नोकरी करतो/करते त्यांना त्यांचे उद्योग बंद करावे लागले तर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.

जर प्रादेशिक आराखड्याने माझे व्यवसाय/घर/शेती/जमीन विस्थापित होणार असेल तर मला कर्जफेड करता येणार नाही आणि माझ्या कुटुंबावर हानिकारक परीणाम होणार आहे.

प्रादेशिक आराखड्यात अनेक रस्ते आणि इतर प्रकल्प आहेत ह्या मुळे माझ्या परीसरात वाहने आणि प्रदूषण वाढणार आहे , ज्याचा मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास होणार आहे.

म्हणून ह्या विकास आराखड्याला माझा विरोध आहे.

==========================================
 सुचना व हरकतीसाठी नमुना प्रत
टीप : प्रत्येकाने स्वत:च्या अक्षरात ही हरकत घेणे गरजेचे आहे .
ही हरकत कोणत्याही वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात.
एका घरातील प्रत्येक व्यक्तीने ही हरकत घेणे महत्वाचे आहे.
एका कुटुंबात ५ सदस्य असतील , तर ५ हरकती घेणे गरजेचे आहे.
पर्यावरण संवर्धन समितचे कार्यकर्ते हरकतीचे नमुने आपल्या गावात उपलब्ध करून देतील, तसेच आपल्या गावात येऊन हरकत नमुने भरण्यास मदत करतील. 
 पर्यावरण संवर्धन समिती वसई विरार www.pssv.org

No comments:

Post a Comment